भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख व्ही. नारायणन म्हणाले की, या वर्षाच्या अखेरीस पहिले मानवरहित अभियान सुरू केले जाईल. यानंतर,2026 मध्ये आणखी दोन मानवरहित मोहिमा राबवल्या जातील.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना इस्रो प्रमुख म्हणाले, 'पहिले मानवी अभियान आता 2027 च्या पहिल्या तिमाहीत होईल.' ते पुढे म्हणाले, 'इस्त्रो मानवरहित मोहिमेचा भाग म्हणून अंतराळवीरांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवण्यापूर्वी अर्ध-मानवी रोबोट 'व्योमित्र' अवकाशात पाठवेल.'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात गगनयान मोहिमेची घोषणा केली होती. त्यांनी भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाणाचे 2022 हे लक्ष्य ठेवले होते. पण कोरोना साथीमुळे अंतराळवीरांच्या प्रशिक्षणात अडथळा निर्माण झाला. या मोहिमेशी संबंधित तंत्रज्ञान तयार करण्यासाठीही जास्त वेळ लागत आहे.