चांगला पाऊस पडण्यासाठी बेडकांच्या लग्नात 1000 वऱ्हाडी

सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (16:34 IST)
हजारो लोकांच्या उपस्थिती दोन बेडकांचं (unique frog marriage) लग्न पार पडलं. हिंदू विवाह परंपरेनं 11 सप्टेंबर रोजी हे लग्न झालं. या खास लग्नासाठी वधू आणि वराच्या बाजूचे 1000 हून अधिक लोक उपस्थित होते.  
 
ह्या लग्नात लोक नाचले, गायले आणि जेवणही केले. मंत्राच्या जपाने पंडितांनी विवाह सोहळ्याची सांगता केली. या अनोख्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. छत्तीसगडची राजधानी रायगडमध्ये हे अनोख लग्न पार पडलं. छत्तीसगडच्या ग्रामीण भागात अशी धारणा आहे की, जर दोन बेडकांचे लग्न लावले की भागात चांगला पाऊस पडतो. या विश्वासाखातर रायगड जिल्ह्यातील लैलुंगा ब्लॉकमधील बेस्किमुडा या छोट्याशा गावात शनिवारी नर बेडूक आणि मादी बेडकाचा विवाह पूर्ण रितीरिवाजानं झाला. हिंदू परंपरेत जसे एखाद्याचं लग्न होते, त्याच विधींसह हा विवाह सोहळा पूर्ण थाटामाटात पार पडला. या खास लग्नाच्या आमंत्रणासाठी लग्नपत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. 
 
लग्नात सामील झालेले भागातील भाजयुमो नेते कृष्णा जयस्वाल यांनी सांगितलं की, सोनाजोरी गावातील संपूर्ण ग्रामस्थ वर पक्षाच्या बाजूने बेस्किमुडामध्ये लग्नाच्या मंडपात हजर झाले. गायन, वादनासह लोकांनी नृत्यही केलं.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती