अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले आहे. हा अपघात इतका भयानक आहे की धुराचे लोट आकाशात पसरले आहेत. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही, परंतु अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी उपस्थित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रवासी विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. टेक ऑफ दरम्यान हा अपघात झाला. असे सांगितले जात आहे की विमान ज्या ठिकाणी कोसळले त्या ठिकाणाभोवती एक निवासी क्षेत्र देखील आहे.
अपघाताबाबत एअर इंडियाचे विधान
एअर इंडियाचे विमान AI171 ला अहमदाबादमध्ये अपघात झाला आहे. आता यावर एअर इंडियाचे विधानही समोर आले आहे. एअर इंडियाने ट्विटरवर पोस्ट केले की, 'अहमदाबादहून लंडनला जाणारी फ्लाईट AI171 आज १२ जून २०२५ रोजी क्रॅश झाली. सध्या आम्ही तपशीलांची पडताळणी करत आहोत आणि शक्य तितक्या लवकर पुढील अपडेट्स शेअर करू. या विमान अपघातात २३२ लोक होते असे सांगण्यात येत आहे.'