माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार, अमित शाह उपस्थित राहणार

सोमवार, 16 जून 2025 (14:38 IST)
अहमदाबाद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचे अंत्यसंस्कार आज राजकोटमध्ये राजकीय सन्मानाने पार पडतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह अनेक नेते अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. 
 
रविवारी विजय रुपानी यांचे पार्थिव डीएनए सॅम्पलिंगद्वारे तपासण्यात आले. त्यानंतर, त्यांचे पार्थिव चार्टर्ड विमानाने राजकोटला नेले जाईल. आज सायंकाळी ५ वाजता येथे त्यांचे अंत्यसंस्कार केले जातील. तत्पूर्वी, त्यांचे पार्थिव पुजित सोसायटीमध्ये ठेवण्यात आले आहे, जिथे त्यांचे कुटुंब, समर्थक आणि स्थानिक लोक अंत्यदर्शन घेतील. 
ALSO READ: बुलढाणा : देवी दर्शनासाठी गेलेल्या आई आणि मुलीचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
८७ मृतांची ओळख पटली
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाच्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची आतापर्यंत ८७ मृतांची डीएनए मॅचिंगद्वारे ओळख पटली आहे आणि ४७ जणांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले आहेत. १२ जून रोजी झालेल्या विमान अपघातात अनेक लोक इतके जळाले होते की त्यांचे मृतदेह ओळखता आले नाहीत म्हणून मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचण्या केल्या जात आहे.
ALSO READ: देशात कोरोना वेगाने पसरत आहे; मायानगरी मध्ये चिंता वाढली, या लोकांनी काळजी घ्या
Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती