विमाने देशांतर्गत प्रवास करायचा असेल तरी आता यापुढे प्रवाशाकडे सरकारी ओळखपत्र असणं बंधनकारक असणार आहे. देशांतर्गत विमान प्रवासाचं तिकीट काढण्यासाठी आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट किंवा पॅन कार्ड यापैकी एका ओळखपत्राचा क्रमांक देणं बंधनकारक असणार आहे. ८ सप्टेंबर रोजी केंद्र सरकार यासंदर्भातील नियम जाहीर करणार आहे. भारतात सुरक्षेच्या दृष्टीने ‘नो फ्लाय लिस्ट’तयार करण्यात येत असून, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यांत येणार असल्याचं सांगितलं जातंय.