नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात असलेल्या लोकांनी आपापल्या घराबाहेर तिरंगा फडकवावा, असे आवाहन एमआयएचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले. हैदराबादमध्ये आोजित केलेल्या एका सभेत ते बोलत होते.
ओवेसी यांनी यावेळी आंदोलकांना अहिसेंच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहनदेखील केले. या आंदोलनांदरम्यान कोणी तुम्हाला त्रास दिला तर तुम्ही हिंसा करू नका. आंदोलनादरम्यान हिंसा झाल्यास आपली बाजू चुकीची ठरेल. आपल्याला हा लढा पुढचे सहा महिने सुरू ठेवायचा आहे. त्यामुळे शांततेत हे सगळे पार पाडले पाहिजे. आपल्याला या कायद्याविरोधात लोकशाही मार्गाने लढा उभाराचा आहे, असे ते म्हणाले. या सभेला उपस्थित नागरिकांसमोर संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करत 'संविधान बचाओ दिवस' साजरा करणसही सांगितले.