बस आणि ऑटोरिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू

मंगळवार, 22 ऑक्टोबर 2024 (10:56 IST)
आंध्र प्रदेश मधील अन्नमय जिल्ह्यातील कालाकडा गावात खासगी बस आणि ऑटोरिक्षा यांच्यात भीषण टक्कर झाली. त्यामुळे पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहे.   

सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. दुसऱ्या बसला ओव्हरटेक करत असताना बसची ऑटोरिक्षाला समोरासमोर धडक झाली.
 
मिळालेल्या माहितीनुसार ऑटोरिक्षात प्रवास करणाऱ्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका गंभीर जखमीचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला आहे. अन्य दोन जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती