केरळमधील पंडालम येथील रहिवासी असलेल्या बीवी फातिमा यांनी पथनामथिट्टा येथील कॅथोलिक हायस्कूलमध्ये आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते. नंतर त्यांनी तिरुअनंतपुरम कॉलेजमधून बॅचलर ऑफ सायन्सची पदवी मिळवली. त्यांनी सरकारी विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी प्राप्त केली आणि 14 नोव्हेंबर 1950 रोजी त्यांची वकील म्हणून नोंदणी झाली.
तामिळनाडूच्या राज्यपालपदी नियुक्त होण्यापूर्वी, फातिमा बीवी यांना 3 ऑक्टोबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (भारत) चे सदस्य बनवण्यात आले. याशिवाय त्यांनी राज्यपालपदाच्या कार्यकाळात तामिळनाडू विद्यापीठाचे कुलपती म्हणूनही काम केले.