महागाईविरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांविरोधात एफआयआर

रविवार, 7 ऑगस्ट 2022 (10:40 IST)
देशातील बेरोजगारी आणि महागाईविरोधात काँग्रेसने शुक्रवारी (5 ऑगस्ट) आंदोलन केलं होतं. दिल्लीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधीसह पक्षाचे अनेक नेत्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. काँग्रेसच्या नेत्यांनी संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला होता. मात्र हा मोर्चा रोखत पोलिसांनी या नेत्यांना ताब्यातही घेतलं होतं.
 
आता याच प्रकरणी दिल्ली पोलिसांनी शनिवारी (6 ऑगस्ट) काँग्रेस नेत्यांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणे आणि त्यांना कर्तव्य बजावण्यापासून रोखणे असे आरोप काँग्रेस नेत्यांवर लावण्यात आल्याचं  म्हटलं आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती