रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आहे. ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहेत त्यांना केंद्र सरकारकडून अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात.सध्या दिल्ली सरकारने रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. नियमांमध्ये बदल झाल्यानंतर आपण दुकानात न जाता देखील रेशन घेऊ शकता.दिल्ली सरकारने जाहीर केले आहे की जे मोफत रेशनची सुविधा घेतात आणि दुकानात जाऊन रेशन घेऊ शकत नाहीत,त्यांना आता घरी बसल्या रेशन मिळेल.दिल्ली सरकारने रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे.नियमांमध्ये बदल झाल्यानंतर आपण रेशन दुकानात न जाता देखील रेशन घेऊ शकता.
नियमांमध्ये बदल-
नियमांमध्ये बदल केल्यानंतर,जर आपणांस रेशन घेण्यासाठी जाणे शक्य नसेल,तर आपण पर्यायी म्हणून आपल्या ऐवजी रेशन दुकानात दुसऱ्या कोणाला पाठवून रेशन मिळवू शकता.
दिल्ली सरकारने म्हटले आहे की जे वैद्यकीय कारणांमुळे,अपंग असल्यास किंवा इतर कोणत्याही समस्येमुळे रेशन घेण्यासाठी जाऊ शकत नाहीत,ते त्यांच्या आधारावर या कामासाठी दुसऱ्या व्यक्तीला नामांकित करू शकतात किंवा पाठवू शकतात.
सध्या रेशन घेण्यासाठी कार्डधारकाला बायोमेट्रिकवर फिंगरप्रिंट द्यावे लागते, ज्यामुळे आपले रेशन इतर कोणीही घेऊ शकत नाही, परंतु सरकारने जारी केलेल्या नवीन नियमानुसार,आता आपल्याऐवजी इतर कोणालाही पाठवून आपण रेशन मिळवू शकता.
कोण घेऊ शकत लाभ -
या नियमाचा लाभ त्या लोकांना दिला जाईल ज्यांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे किंवा जे ग्राहक 16 वर्षांपेक्षा कमी आहेत ते देखील त्याचा लाभ घेऊ शकतात कारण त्यांच्याकडे फिंगरप्रिंट नाही.याशिवाय अपंग सदस्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.
कशा प्रकारे घेता येईल रेशन-
* यासाठी रेशन कार्ड धारकाला नामांकन अर्ज भरावा लागेल.
* हा फॉर्म रेशन कार्ड,आधार कार्ड सोबत सबमिट करावा लागेल.
* नॉमिनी व्यक्तीची कागदपत्रे देखील या फॉर्मसह सादर करावी लागतील.
* यानंतर ज्या व्यक्तीला नॉमिनी करण्यात आले आहे ती व्यक्ती आपल्या ऐवजी दुकानात जाऊन रेशन घेऊ शकते.