जेएनयू मध्ये मांसाहार जेवणावरून दोन गटात हाणामारी

सोमवार, 11 एप्रिल 2022 (23:22 IST)
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) पुन्हा एकदा वादात सापडले आहे. येथील कावेरी वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये रविवारी हिंसक हाणामारी झाली. रामनवमीला मांसाहार करण्यावरून हा वाद सुरू झाला. काही वेळातच दगडफेक सुरू झाली. यामध्ये अभाविप (ABVP)आणि डाव्या संघटनांचे 10 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. 
 
ABVP च्या विध्यार्थी परिषद ने स्टुडंट युनियनचे आरोप फेटाळून लावले आहे. रामनवमीच्या दिवशी दुपारी साढे तीन च्या सुमारास काही विद्यार्थ्यांनी पूजेचे कार्यक्रमाचे आयोजन केले असता डाव्या संघटनेचे विद्यार्थी पूजा बंद करायला आले. त्यावेळी जेवणात मांसाहाराच्या वादावरून दोन्ही गटात हाणामारी झाली. असा आरोप ABVP ने केला आहे. 
 
देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था जेएनयू वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही जेएनयूचा संबंध दीर्घकाळ वादात सापडला आहे. जेएनयूमधील डाव्या संघटनांवर कधी भारतीय जवानांच्या हौतात्म्याचा तर कधी पाकिस्तानच्या समर्थनार्थ मुशायरा साजरा केल्याचा आरोप करण्यात आला. अनेकवेळा हिंसक घटना घडल्या आहेत

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती