या युवकाने ४ पानांची सूसाइड नोट लिहून ठेवली आहे. त्यात त्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्यामुळे आपल्या कुटुंबियाची माफी मागितली आहे. तसेच त्याने आपले देहदान करण्याची विनंती केली आहे. आपण आत्महत्या करणार असल्याचे सदर युवकाने आधीच आपले मित्र आणि कुटुंबियाना सांगितले होते. त्यामुळे आत्महत्या केलेल्या युवकाच्या मित्रांनी फेसबुकवर ही घटना लाइव्ह पाहिली.आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव श्याम सीकरवार उर्फ राज असे आहे. ''मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. ती दुसऱ्या कोणाबरोबर लग्न करत आहे हे मी सहन करू शकत नाही. तिला गमावलेल्या टेन्शनमध्ये माझी नोकरीही गेली'', असे त्याने सुसाइट नोटमध्ये लिहिले आहे.