आसामच्या वेगवेगळ्या भागात संततधार पावसामुळे प्रमुख नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. गुवाहाटीतील ब्रह्मपुत्र नदीचे पाणी धोक्याच्या पातळीच्या फक्त एक मीटर खाली आहे. मात्र, नदीची पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. केंद्रीय जल आयोगाचे अधिकारी साजिदुल हक म्हणाले, “ब्रह्मपुत्र नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहे आणि त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपासून १ मीटर खाली आहे.”Assam: Water level of Brahmaputra river continues to rise in Guwahati, following heavy rainfall. Sajidul Haq from Central Water Commission says, "Water has crossed the warning level, it is expected to increase further. It is about 1 metre away from the danger level". (24.06.20) pic.twitter.com/wZEWumdp37
— ANI (@ANI) June 24, 2020