शुक्रवारी कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या कारवाईदरम्यान, सुरक्षा कर्मचाऱ्यांना शनिवारी मोठे यश मिळाले, ज्यामध्ये एक दहशतवादी ठार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील अखल भागात शुक्रवारी रात्री उशिरापासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. भारतीय लष्कर, एसओजी, जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफ या कारवाईत सहभागी आहे. आतापर्यंत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार मारले आहे.