वीज जोडणीसाठी आता कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र लागणार नाही. केवळ अधिकृत ओळखपत्र आणि वास्तव्याचा अधिकृत पुरावा दिल्यास व आवश्यक शुल्क भरल्यास वीज जोडणी देता येईल, असे परिपत्रक उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने जारी केले.
कोणत्याही जागेच्या मालकाने वीज जोडणीसाठी अर्ज केल्यास त्या जागेसाठी वीज वितरण परवानाधारकाकडून वीज पुरवठा करण्याची तरतूद विद्युत अधिनियमात आहे. काही वीज वितरण कंपन्या ना हरकत प्रमाणपत्राची मागणी वीज जोडणीसाठी करीत असतात. त्याशिवाय वीज पुरवठा करीत नाहीत पण अधिकृत ओळखपत्र, अधिकृत वास्तव्याचा पुरावा व आवश्यक शुल्क भरल्यास वीज पुरवठा करण्यास शासनाने मान्यता दिली.