नवाब मलिक यांची संपत्ती जप्त करण्यास ईडीला मिळाली परवानगी

शनिवार, 5 नोव्हेंबर 2022 (21:03 IST)
मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक  यांची संपत्ती जप्त करण्यास ईडीला परवानगी मिळाली आहे. यामध्ये मुंबईतील गोवावाला कंपाऊंडमधील जमिनीचा एक भाग, कुर्ला पश्चिमेला तीन फ्लॅट, वांद्रे पश्चिम येथील दोन फ्लॅट आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 147 एकर शेतजमिनीचा समावेश आहे. दरम्यान मालमत्ता ताब्यात घेण्याबाबत ईडीचे अधिकारी कायदेशीर सल्लामसलत करत आहेत. 
 
फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची दिवंगत बहीण हसना पारकरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने कारवाई करत फेब्रुवारी महिन्यामध्ये नवाब मलिक यांना अटक केली होती. नवाब मलिक सध्या न्यायलयीन कोठडीत असून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती