Earthquake: गेल्या 12 तासांत 3 देशांत भूकंपाचे धक्के जाणवले

सोमवार, 23 ऑक्टोबर 2023 (11:19 IST)
गेल्या 12 तासांत वेग वेगळ्या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. म्यानमार, नेपाळ आणि भारतातील जम्मू-काश्मीर  मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे 6 वाजेच्या सुमारास म्यानमार मध्ये 4.3 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. याचे केंद्रबिंदू जमिनीपासून 90 किमी खोलीवर होते. तर मिझोराम मध्ये रविवार-somvarchya मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास 3.5 तीव्रतेचा भूकंप आला असून आईजवाल हे भूकंपाचे केंद्रबिंदू होते. 

तर भारतातील जम्मू-काश्मीर मध्ये किश्तवाडा जिल्ह्यात रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास 6.1 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. बागमती आणि गंडकी प्रांतात देखील भूकंपाचे धक्के जाणवले. तसेच हा भूकंप काठमांडू मध्ये देखील जाणवला असून या भागात 20 घरांचे नुकसान झाले. भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. 
















 Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती