मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत संघटनात्मक उपक्रमांचा भाग म्हणून आज म्हणजे 16 ते 21 जानेवारी दरम्यान केरळला भेट देणार आहे. तसेच डॉ. भागवत दक्षिण केरळ प्रदेशातील संघ कार्यकर्त्यांसोबत विविध बैठकांमध्ये सहभागी होतील. तसेच आरएसएस शताब्दी समारंभाच्या पूर्वसंध्येला, 17 जानेवारी रोजी एर्नाकुलम जिल्ह्यातील कोलानचेरी येथील परमभट्टारा केंद्र विद्यालयात विद्यार्थी कार्यकर्त्यांची एक दिवसाची बैठक आयोजित केली जाईल.
यानंतर, भागवत येथे विद्यार्थी स्वयंसेवकांच्या बैठकीला उपस्थित राहतील, असे सांगण्यात आले आहे. तसेच संघ प्रमुख 21 जानेवारी रोजी सकाळी परतणार आहे.