मंगळवारी रात्री ट्रम्प यांनी फोनवरुन मोदींशी संवाद साधला. यावेळी ट्रम्प आणि मोदी यांच्यामध्ये दहशतवाद, संरक्षण आणि व्यापार वाढीच्या संदर्भात चर्चा झाली. दोन्ही देशातील संबंध आणखी दृढ करण्याच्या दृष्टीने या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली चर्चा महत्वाची मानली जात आहे. दरम्यान दहशतवादाविरोधात अमेरिका आणि भारत खांद्याला खांदा लावून लढेल, असं बोलणंही दोघांमध्ये झालं. व्हाईट हाऊसकडून ही माहिती देण्यात आली आहे.