पाठीमागच्या 11 दिवसांपासून मुंबईतल्या ब्रीच कँडी रूग्णालयात योग्य उपचार घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आज त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. धनंजय मुंडे हे कोरोनावर मात करणारे महाविकासआघाडी सरकारमधील तिसरे मंत्री आहेत. यापूर्वी जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण यांना लागण झाली होती. या दोन्ही नेत्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती.