ट्रॅकवर पडलेली 2000 ची नोट उचलण्यासाठी महिलेने मेट्रो पुढे उडी मारली

दिल्ली मेट्रोच्या ब्ल्यू लाइनवर मंगळवारी सकाळी एक महिलेने अचानक ट्रॅकवरून उडी मारली. महिलेचा 2000 ची नोट ट्रेकवर पडल्याचे सांगितले जात आहे. नोट उचलण्यासाठी तिने ट्रेकवर उडी मारली या दरम्यान प्लॅटफॉर्मवर द्वारकाहून देखील ट्रेन येत होती परंतू सुरक्षा कर्मचार्‍याने महिलेचा जीव वाचवला. ही घटना द्वारका मोड स्टेशनाची आहे.
 
मेट्रोच्या आधिकारिक सूत्रांप्रमाणे महिला झडौदा कला भागात राहत असून ती सकाळी 10:40 वर द्वारका मोड मेट्रो स्टेशनावर वाट बघत होती. या दरम्यान तिच्या हातून नोट ट्रेकवर पडली आणि नोट उचलण्यासाठी तिने ट्रेकवर उडी मारली.
 
द्वारका बाजूने येत असलेल्या ट्रेनला बघून प्लॅटफॉर्मवरील प्रवाशी भ्यायले. ट्रेन प्लॅटफॉर्मवर पोहचणार याआधीच एका सुरक्षा कर्मचार्‍याने महिलेला ट्रॅकवरून बाहेर काढले.
 
या घटनेमुळे ब्ल्यू लाइनवर काही वेळासाठी संचलन प्रभावित झाले ज्यामुळे प्रवाशांना आपल्या गंतव्य स्थळांवर पोहचण्यास जरा त्रास उचलावा लागला. तरी मेट्रो रेल पोलिस घटनेची तपासणी करत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती