दिल्लीचा श्वास कोंडलेलाच, शाळा 3 दिवस बंद

सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 (12:01 IST)
नवी दिल्ली- वाढत्या प्रदुषणाने दिल्लीकरांना श्वास घेणे मुश्किल झाले आहे. या समस्येच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तातडीची बैठक बोलवली होती. येथे तीन दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून केजरीवाल यांनी लोकांना घरात राहण्याचा व शक्यतोर घरातून काम करण्याचा सल्लाही दिला आहे.
 
तसेच दिल्लीतील उत्पादन क्षेत्रातील उद्योग व्यवसायदेखील 5 दिवसांसाठी बंद ठेवण्याची सक्ती करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त दिल्लीतील प्रदुषणाच्या धुराला नियंत्रित करण्यासाठी कृत्रिम पावसाचा मार करून थोपविण्याचा विचार सरकार करत आहे.
 
राजधानी नवी दिल्लीचे लोक 17 वर्षांच्या सर्वात दाट धुक्याने बेजार झाले आहेत. हवा विषारी झाल्याने लोकांना मास्क परिधान करून बाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला. 

वेबदुनिया वर वाचा