अयोध्याप्रकरणी दररोज सुनावणी घेण्याचा निर्णय

शुक्रवार, 19 जुलै 2019 (09:00 IST)
अयोध्याप्रकरणी दररोज सुनावणी घेण्याचा निर्णय २ ऑगस्टपासून घेण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. ५ न्यायाधीशांचं खंडपीठ सुनावणी करणार असंही स्पष्ट केले आहे. राम मंदिर व  बाबरी वादावर सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला  मध्यस्थ समिती ३१ जुलैपर्यंत काम करेल असंही कोर्टाने स्पष्ट केले आहे. अयोध्या आणि बाबरी वाद प्रकरणात मध्यस्थांच्या समितीने ३१ जुलैपर्यंत अहवाल द्यावा असे सुप्रीम कोर्टाने म्हटले, हवाल दिल्यानंतर २ ऑगस्टपासून दररोज सुनावणीला सुरुवात करण्यात येणार आहे. या आगोदर मध्यस्थांच्या समितीला अहवाल सादर करण्यासाठी १८ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ती वाढवून ३१ जुलै करण्यात आली आहे. मध्यसस्थांच्या समितीकडून काय तोडगा निघतो ते देखील पाहू असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती