खासदार पप्पू यादव यांना जीवे मारण्याची धमकी

सोमवार, 28 ऑक्टोबर 2024 (13:18 IST)
बिहारमधील पूर्णिया येथील खासदार पप्पू यादव यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने धमकी मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी पप्पू यादवने 24 तासांत लॉरेन्स बिश्नोईचे नेटवर्क संपवू असे सांगत टोळीला आव्हान दिले होते.
 
मिळालेल्या माहितीनुसार धमकी मिळाल्यानंतर पप्पू यादवने पोलिसांना माहिती दिली.खासदार पप्पू यादव यांनी सांगितले की, लॉरेन्स बिश्नोई टोळीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकी मिळाल्यानंतर पप्पू यादवने बिहारच्या डीजीपींकडे संरक्षणाची विनंती केली आहे. पप्पू यादव म्हणाले, 'लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेऊन मला धमकावण्यात आले आहे. मी बिहारचे डीजीपी आणि पूर्णियाच्या आयजींना याबाबत कळवले आहे. त्यांनी केंद्र सरकारला त्यांची सुरक्षा वाढवण्याचे आवाहन केले आहे.
 
तसेच पप्पू यादव म्हणाले की, 'मला सतत धमक्या येत आहे. माझ्यासोबत कोणतीही अनुचित घटना घडू शकते. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने व्हॉट्सॲपवरून फोन करून पप्पू यादवला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ज्यामध्ये खासदार यांना सलमान खान प्रकरणापासून दूर राहा असे धमकावण्यात आले आहे. 
 
सांगण्यात आले आहे की, बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर खासदार पप्पू यादव यांनी बिश्नोई टोळीला आव्हान दिले होते आणि ते म्हणाले होते की लॉरेन्स बिश्नोईचे नेटवर्क 24 तासांत संपवू शकतो. ते म्हणाले होते, 'तुरुंगात बसलेला गुन्हेगार त्याच्या इच्छेनुसार लोकांना मारतो आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती