दहशतवादी बुरहानच्या मृत्यूला 1 वर्ष झाले तरी घाटीत आहे त्याच्या 'भूत'ची भिती!

शुक्रवार, 7 जुलै 2017 (12:13 IST)
हिजबुल कमांडर बुरहान वाणीच्या मृत्यूच्या एका वर्षानंतर देखील तो काश्मीरमध्ये सुरक्षा दलांसाठी फार मोठा दुश्मन बनलेला आहे. कुठल्याही दहशतवाद्यांच्या वर्षश्राद्‍धाला एवढी कडक सुरक्षा करण्यात आली नाही आहे. बुरहानच्या मृत्यूनंतर देखील सशस्त्र बळांना चैन नाही आहे आणि त्यांच्यासमोर धोका दिसून येत आहे.  
 
सांगायचे म्हणजे की बुरहान वाणी 8 मे, 2016 रोजी सुरक्षा बळांसोबत झालेल्या चकमकीत मृत्युमुखी पडला होता. त्यानंतर दरीत बर्‍याच महिन्यांपर्यंत हिंसा होत राहिली आणि गतिरोधाची स्थिती राहिली.  
 
बुरहानच्या वर्षश्राद्धाअगोदरच फुटीरवादी आणि दहशतवादी संघटना या दिवशी कार्यक्रम करण्याचे वृत्त समोर आले होते.  हुर्रियत नेता आणि हिजबुलचे सुप्रीम कमांडर सैयद सलाहुद्दीनने 8 जुलै रोजी घाटी बंद करून संपूर्ण आठवडा प्रदर्शन करण्याचे आव्हान दिले होते.  
 
बर्‍याच जागांवर खास करून दक्षिणी काश्मीरमध्ये बरेच पोस्टर्स लागले आहे ज्यात बुरहानच्या फोटोग्राफसोबत लिहिले आहे 'गो इंडिया गो बँक' आणि 'वी वॉन्ट फ्रीडम'.
 
सांगायचे म्हणजे बुरहान घाटीच्या तरुणांसाठी एक आयकॉन प्रमाणे होता. त्याला ते हीरो मानत होते. असे म्हटले जाते की त्याने  दहशतवादी कारवायांना सोशल मीडियाचे माध्यम बनवण्याचा प्रयत्न केला होता आणि बर्‍याच लोकांना त्याच्याशी जोडले होते. अशात त्याचे वर्षश्राद्धावर विरोध प्रदर्शन किंवा रॅलीची तयारी करण्यात आली आहे. पण, सुरक्षा दलांचे देखील कडक व्यवस्था आहे.  

वेबदुनिया वर वाचा