धोकादायक फानी चक्रीवादळ शुक्रवारी धडकणार, सेना अलर्ट

गुरूवार, 2 मे 2019 (10:58 IST)
चक्रीवादळ फानीचे रूपांतर अतितीव्र चक्रीवादळात झाले आहे. शुक्रवारी ओडिशामधील पुरी आणि केंद्रपाडादरम्यानच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दरम्यान वार्याचे वेग 175-200 किमी प्रति तास असे असू शकतं. तरी भारतीय हवामान विभागाने चक्रीवादळाचे निश्चित स्थान अद्याप सांगितलेले नाही.
 
तरी प्राप्त माहितीनुसार फानी चक्रीवादळ बंगालच्या उपसागराच्या आग्नेय आणि नैऋत्येच्या दरम्यान आहे. पुरीपासून ८३० किलोमीटर दक्षिणेकडे, विशाखापट्टणमपासून दक्षिण-आग्नेयेकडे ६७० किलोमीटर आणि त्रिंकोमलीपासून (श्रीलंका) ईशान्येकडे ६८० किलोमीटर अंतरावर असल्याचे विभागाने म्हटले आहे. 
 
या संदर्भात बोलताना एसआरसी सेठी म्हणाले, 'हवामान विभागाच्या अंदाजानुसार फानी पुरी जिल्ह्याच्या सातपाडा किंवा चंद्रभागादरम्यान शुक्रवारी रात्री धडकण्याची शक्यता आहे.' 
 
अमेरिकी नौदलाप्रमाणे ओडिशा किनारपट्टीला चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. तितली वादळापेक्षा फानीचा तडाखा अधिक तीव्रतेचा असेल, असे शक्यता वर्तवली जात आहे.
 
या दरम्यान ईस्ट कोस्टर्न रेल्वेने 103 ट्रेन रद्द केल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती