राज्यसभा निवडणुकीबद्दल यूपीत बरीच गहमागहमी आहे आणि यामुळेच सपा, बसपा, भाजप आणि काँग्रेसमध्ये बैठकी सुरू आहेत. महत्त्वाचे म्हणजे निवडणुकीत क्रॉस वोटिंगची शंका सर्व दलांना आहे म्हणून सर्वजण आपापल्या प्रयत्नात आहे.
असे नाही आहे की क्रॉस वोटिंगची आशंका फक्त बसपा आणि सपालाच आहे. भाजपला देखील क्रॉस वोटिंगची आशंका आहे. सीएम योगी आदित्यनाथ यांनी भाजपचे सर्व विधायकांना आपल्या घरी जेवायला बोलावले होते ज्याचे मुख्य कारण म्हणजे सर्वांच्या मनातील समजता येईल. अमित शहा यांच्याशी भेटीनंतर सुहेलदेव समाज पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर देखील या मेजवानीत सामील जाले होते. या अगोदर ते भाजपशी नाराज होते. भाजपचे सहयोगी पार्टी आपल्या पक्षाचे सर्व 9 एमएलए, नुकतेच भाजपमध्ये सामील झालेले नरेश अग्रवाल यांचे विधायक बेटे नितिन देखील, अपक्ष विधायक अमनमणि त्रिपाठी आणि विजय मिश्र देखील मेजवानीत पोहोचले.
अखिलेश यादव यांनी आपले सहयोगी आणि विधायकांसाठी डिनर ठेवला होता. या डिनरमध्ये सपा विधायकांशिवाय निर्दलीय विधायक राजा भैया आणि विनोद सरोज देखील पोहोचले होते. सपाजवळ 47 विधायक आहे. जया बच्चन यांच्या विजयासाठी गरजेचे 37 मतानंतर पक्षाजवळ 10 मत वाचतात. बीएसपीचे 19, काँग्रेसचे 7 आणि आरएलडीचे एक विधायक आहे. या सर्वांना जोडल्यानंतर 35 मत होतात. यात जर राजा भैया आणि विनोद सरोज यांचे मत जोडले तर हा आकडा 37 पर्यंत पोहोचू शकतो. यामुळे बीएसपीचे उमेदवार भीमराव अंबेडकर यांचा विजय निश्चित आहे.