तिसऱ्यांदा रेल्वे उलटवण्याचा कट, रेल्वे रुळावर आढळले सिलेंडर

सोमवार, 30 सप्टेंबर 2024 (12:59 IST)
उत्तर प्रदेश मधील कानपुर मध्ये परत एकदा रेल्वे उलटवण्याचा कट रचण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत ही घटना तिसऱ्यांदा घडली आहे. कानपूर मध्ये रेल्वे ट्रॅकवर सिलेंडर आढळले. रेल्वे ट्रॅकवर रेल्वेचाच सेफ्टी फायर सिलिंडर आढळला. तसेच चालकाच्या हुशारीने सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही आहे. 
 
छत्रपती शिवाजी टर्मिनस वरून  लखनऊ करीत जाणारी पुष्पक एक्सप्रेसच्या लोको पायलट ने सिलेंडर पाहून वेळीच रेल्वे थांबली. ज्यामुळे दुर्घटना टळली आहे. रेल्वे जेव्हा गोविंदपुरी स्टेशन पासून होल्डिंग लाइन जवळ आली तेव्हा संध्याकाळी रेल्वे ट्रॅकवर रे सेफ्टी फायर सिलिंडर पडलेले चालकाने पाहिले. चालकाने सतर्कता दाखवत ब्रेक लावले. व रेल्वेची गती कमीहोऊन रेल्वे थांबली.
 
चालकाने इंजिनमधून खाली उतरून पाहिले की तिथे सेफ्टी फायर सिलिंडर आहे जो रेल्वेला जोडलेला होता. नियंत्रण कक्षात माहिती मिळाल्यानंतर चालकाने त्याला थेट कानपूर सेंट्रलला नेले. व आरपीएफ आणि जीआरपी घटनास्थळी पोहोचले. चौकशी केली असता वरिष्ठ विभाग अभियंत्याने दिलेले रेल्वे सिलिंडर असल्याचे आढळून आले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती