काँग्रेसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमचे यूट्यूब चॅनल 'इंडियन नॅशनल काँग्रेस' हटवण्यात आले आहे. आम्ही याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि टीम या संदर्भात यूट्यूब आणि गुगलशी बोलणी करत आहे. हा तांत्रिक बिघाड आहे की काही षडयंत्र आहे, याचा तपास सुरू आहे. आम्ही परत येऊ अशी आशा आहे.
'भारत जोडो यात्रे'पूर्वी यूट्यूब चॅनल डिलीट
याआधी देशातील अनेक बड्या नेत्यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाले आहेत, मात्र कोणत्याही पक्षाचे यूट्यूब चॅनल डिलीट करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सध्या यामागचे कारण स्पष्ट झाले नसून तपास सुरू आहे. हॅकिंगचा संशय व्यक्त केला जात असला तरी त्याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही.