महाविकास आघाडी सरकार असताना 808 एकर जंगलक्षेत्र घोषित करत कारशेड कांजूरमार्गाला स्थलांतरित करण्याचा निर्णय ठाकरे सरकार कडून घेण्यात आला होता. या निर्णयात बदल करून मुंबई मेट्रो कारशेड आरेतच बनविण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकार यांनी घेतला आहे. यावरून पर्यावरणवाद्यांनी आणि इतर पक्षांनी विरोध दर्शविला असून आज काँग्रेसचे कार्यकर्त्यांसह पर्यावरण प्रेमी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर प्रदर्शन करणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडीतील घरासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.