दिल्लीत काँग्रेसची नाचक्की, निवडणुकीत ६७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

दिल्लीमध्ये कॉंग्रेसला पुन्हा एकदा भोपळाही फोडता आलेला नाही. ७०पैकी ६७ उमेदवारांचे चक्क डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यामुळे काँग्रेसची परती वाट टागल्याचे दिसून येत आहे. मुळातच काँग्रेस पक्षाने मेहनत घेतली नव्हती. भाजप-’आप’च्या भांडणात न पडण्याचे पक्षाचे धोरण होते. मात्र हे कुठवच चालणार, हे पक्षाला आज ना उद्या ठरवावे लागणार आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सध्या देशभरात भाजप विरुद्ध बाकी सगळे असे चित्र आहे. दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीने भाजप विरोधाची जागा भरून काढली आहे.
 
२१ वर्षानंतरही भाजपला अपयश
दिल्लीमधील भाजपचा मतदार निश्चित आहे. २०१५ मध्ये भाजपने केवळ ३ जागा जिंकल्या. मात्र त्यावेळीही पक्षाच्या मतांची टक्केवारी ३२ पूर्णांक ३ टक्के होती. याचाच अर्थ ही मतं कुठेही जाणार नव्हतीच. आता या मतांत वाढ झाली आहे. यावेळी भाजपला ७ जागांवर समाधान मानावे लागत आहे. मात्र, आधीपेक्षा ४ ची अधिक भर पडली आहे, हीच काय ती समाधानाची बाब. या निवडणुकीच प्रश्न होता तो काठावर असलेल्या मतदारांचा. गेल्या निवडणुकीत ही काठावरची मते मिळाल्यामुळे केजरीवाल तब्बल ६७ जागा जिंकू शकले. यावेली ६३ जागांवर त्यांना यश मिळाले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती