राष्ट्रपती निवडणूक बिनविरोध नाही कॉंग्रेस देणार उमेदवार

शुक्रवार, 23 जून 2017 (07:28 IST)

देशाचे सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपती पदाची निवडणूक  १७ जुलैला होणार आहे. मात्र ही निवडणूक  आता तरी  बिनविरोध होण्याची शक्यता नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवार द्यायचा की नाही? यावर चर्चा करण्यासाठी आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधीपक्षांची बैठक सुरु आहे. यामध्ये देशातील प्रमुख विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या बैठकीत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याविरोधात उमेदवार देण्याबद्दलचा अंतिम निर्णय होणार आहे. कोविंद यांच्या नावाविषयी काँग्रेसचं किंवा इतर विरोधीपक्षांचं मत विचारात घेतलं गेलं नाही, असा काँग्रेसचा आरोप आहे. त्यामुले ही निवडणूक बिनविरोध होणार नाही असा पुन प्रयत्न कॉंग्रेस करणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा