अयोध्येत जमावबंदी लागू, वातावरणात तणाव

शनिवार, 24 नोव्हेंबर 2018 (09:30 IST)
अयोध्या प्रश्नी सुनावणी जानेवारीपर्यंत स्थगित ठेवली असतानाही या मुद्यावरून हिंदू संघटनांकडून सभांचे सत्र सुरूच आहे. अयोध्येत रविवारी विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या धर्मसभेच्या पार्श्वभूमीवर येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. 
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील २४ नोव्हेंबरला अयोध्येत पोहचणार आहेत. या पार्श्वभूमीवर अयोध्येत सीआरपीएफ, स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेषत: रामजन्मभूमी परिसरात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
 
तसेच अयोध्या आणि फैजाबाद येथे कलम १४४ (जमावबंदी) लागू केले आहे. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेच्या सभेला येथील व्यापाऱ्यांनी विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे राम मंदिर निर्माणावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे.  
 
 
दोघांनी उघड्यावर केली लघुशंका आयुक्तांनी लगेच दिली उठबश्या शिक्षा  
 
आपल्या देशात सर्वात वाईट गोष्ट अशी आहे के जिथे मोकळी जागा दिसली की पुरुष उघड्यावर थुंकतट  किंवा लघुशंका हमखास करतात. अशाप्रकारे चुकीचं वर्तन करणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाते का? तर नाही. या आगोदर  पुणे पोलिसांनी रस्त्यावर थुकंणाऱ्यांसाठी  कारवाई लागू केली, पुण्यात एखादा माणूस रस्त्यात थुंकताना दिसल्यास दंड भरण्यासोबतच त्याला घाणही साफ करावी लागते, आता सोलापूरमध्येही उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांना अशीच एक  शिक्षा दिली आहे. विशेष म्हणजे ही शिक्षा दुसऱ्या-तिसऱ्या कुणी सुनावली नसून, खुद्द सोलापूर महापालिका आयुक्तांनी केली आहे.
 
झाले असे की पालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांनी गणपती घाट येथे उघड्यावर दोघेजण लघुशंका करत होते ते पाहिले. त्यांचा संताप झाला त्यांनी लगेच या दोघांना चक्क उठा-बशा काढण्याची शिक्षा दिली.आयुक्त अविनाश ढाकणे हे नेहमीप्रमाणे पहाटे वॉकिंग करायला गेले, गणपती घाट येथील मृत्यू पश्चात केल्या जाणाऱ्या विधीच्या ठिकाणी दोनजण लघुशंका करत होते. त्या दोघांवर आयुक्तांची नजर पडताच त्यांनी त्या दोघांना चांगलेच  झापले होते. आयुक्तांनी सांगितले की येथे फक्त पुरुषच नसून महिलासुध्दा वॉकिंगला येतात. आपल्याच घरच्या महिलांसमोर आपण हे कृत्य  करतो का? मग इथे सार्वजनिक ठिकाणी का करता ?लाज वाटत नाही का ? तुम्हाला तरी आई-बहिणी आहेत, असे सांगून आयुक्तांनी त्यांना उठा-बशा करायला लावले. वॉकिंग करणाऱ्या इतरांनी सुध्दा याचा बोध घेतला आहे. त्यामुळे देशात सर्वत्र अश्या प्रकारे खरच शिक्षा करण्याची गरज आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती