आयोध्या येथील राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचं देशात फिरणं आम्ही अवघड करू असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. राऊत हे अयोध्येत पत्रकारांशी संवाद साधला आहे. सरकार जर नोटबंदीचा निर्णय फक्त काही तासांमध्ये घेते मग राम मंदिराचा निर्णय घेणं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काहीच अवघड नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 25 नोव्हेंबरला अयोध्येत येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी शिवसेनेचे दिग्गज नेते आधीच अयोध्येत आले आहेत. उद्धव ठाकरे हे जाहीर सभा घेणार नसून, संतांचे आशीर्वाद आणि शरयू नदीची आरती करणार आहेत असं शिवसेनेने जाहीर केले आहे. राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपला टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनात आणलं तर राम मंदिर बांधणं काहीच अवघड नाही. भाजपने संसदेत कायदा करावा त्याला शिवसेना तर पाठिंबा देईलच त्याच बरोबर अन्य पक्षांचे खासदारही पाठिंबा देतील असे त्यांनी सांगितले. सुरक्षा आणि कायद्याचा प्रश्न निर्माण होईल म्हणून उत्तर प्रदेश सरकारने जाहीर सभा नाकारली आहे. शिवसनेने राम मंदिर मुद्दा जोरदार लाऊन धरला आहे.