झोपलेल्या महिलेच्या नाकात शिरला झुरळ

चेन्नईच्या एका रूग्णालयात डॉक्टरांनी एका महिलेच्या डोक्यातून जिवंत झुरळ काढलं. 42 वर्षाच्या सेल्वी झोपेत असताना हा झुरळ तिच्या नाकातून शिरला आणि डोक्यापर्यंत पोहचला.
चेन्नईच्या शासकीय स्टॅनली रूग्णालयाप्रमाणे एक फेब्रुवारीला रात्री साडे अकरा वाजता सेल्वीला झोपेत आपल्या उजव्या नाकात खाज सुटली. हळू-हळू वेदना वाढू लागल्या तर खाजगी रूग्णालयात दाखवले. तिथे वेदनाचे कारण माहीत पडले नाही म्हणून शासकीय रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला गेला.
येथे ईएनटी विभागाच्या दोन वरिष्ठ चिकित्सकांनी एन्डोस्कोपीने नाकाची तपासणी केली आणि मग ऐसेप्टिक तंत्रानेने जिवंत झुरळ बाहेर काढला, जो खूप आतपर्यंत पोहचून गेला होता. ही घटना दुर्लभ असल्याची रूग्णालयाने सांगितली असून झुरळ काढल्यानंतर रूग्णाला लगेच आराम मिळाला.

वेबदुनिया वर वाचा