दिल्लीमध्ये अमित शाह आणि नितीन गडकरींना भेटले सीएम योगी, निवडणूक परिणाम नंतर पहिल्यांदा भेट

सोमवार, 10 जून 2024 (12:51 IST)
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कॅबिनेट मंत्री अमित शाह यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. तसेच योगीनीं नवीन सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री शपथ घेतली म्हणून शहा यांना अभिनंद केले. सरकार युती नंतर या भेटीला खूप महत्वाचे मानले जाते आहे. 
 
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरवात झाली आहे. 9 जूनला मोदींनी आपल्या मंत्रीसोबत शपथ विधी केला. राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवराज सिंह सोबत भाजप जेष्ठ नेते यांनी देखील कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. यादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अमित शाह आणि नितीन गडकरी समवेत इतर नेत्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. 
 
सीएम योगिनीं पहिले अमित शाह यांची भेट घेतली. सरकार बनल्यानंतर अमित शाह आणि सीएम योगी यांची भेट महत्वपूर्ण मनाली जाते आहे. तसेच योगी यांनी कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी यांची देखील भेट घेतली. त्यांनी गडकरींना नवीन सरकारमध्ये सहभागी झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती