मिळालेल्या माहितीनुसार, राजकोटच्या जसानी स्कूलमध्ये इयत्ता 8 वी मध्ये शिकणारी रिया अभ्यास करताना अचानक बेंचवर पडली. विद्यार्थिनीला तत्काळ रुग्णालयात नेण्यात.आले, मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. थंडीमुळे विद्यार्थिनीला हृदयविकाराचा झटका आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तात्काळ उपचार न मिळाल्याने त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला.