बनावट पासपोर्ट प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह चार जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. दिल्लीच्या पटियाला न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. दोषी ठरवलेले इतर तिघे हे पासपोर्ट कार्यालयाचे निवृत्त अधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे. 70 पैकी अधिक खटल्यात आरोपी असलेल्या छोटा राजनविरोधातील हे पहिले प्रकरण असेल, ज्यावर न्यायालय त्याला शिक्षा सुनावणार आहे. बनावट पासपोर्ट प्रकरणात पटियाला हाऊस न्यायालयाने चौघांविरोधात भारतीय दंडविधान कलम420, 468, 471, 120बी, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत. सीबीआयने पहिले आरोपपत्र फेब्रुवारी 2016 मध्ये न्यायालयात दाखल केले होते.