जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडले आहे. या हल्ल्यात निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला, ज्यात आंध्र प्रदेशातील दोन रहिवाशांचा समावेश होता. तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या दुःखद घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली.