चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामांतर, Punjab आणि Haryana सरकारचा मोठा निर्णय

शनिवार, 20 ऑगस्ट 2022 (22:37 IST)
चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळ आता शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखले जाणार आहे. हरियाणा आणि पंजाब सरकारमध्ये विमानतळाचे नाव बदलण्यासाठी  करार झाला आहे. सुरुवातीपासूनच विमानतळाचे नामकरण शहीद भगतसिंग यांच्या नावावर करण्याची चर्चा होती. ज्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.  
 
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलण्याबाबत बैठक घेतली. या बैठकीत विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यावर दोन्ही बाजूंनी एकमत झाले. आतापासून चंदीगडचे आंतरराष्ट्रीय विमानतळ शहीद  भगतसिंग यांचे नाव देण्यावर दोन्ही बाजूंनी एकमत झाले. आतापासून चंदीगडचे आंतरराष्ट्रीय विमानतळ शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखले जाईल.   चंदिगड विमानतळ बनल्यापासून त्याच्या नावाबाबत शंका होती ती आता संपली आहे.  
 
2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंदीगडच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले होते. हे विमानतळ दुमजली करण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावर देशांतर्गत उड्डाणांसाठी आणि दुसऱ्या मजल्यावर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी टर्मिनल आहे. विमानतळावर 48 तिकीट काउंटर आणि 10 इमिग्रेशन  काउंटर आहेत.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती