ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘प्रधानमंत्री व्यय वंदना योजना’

शनिवार, 22 जुलै 2017 (09:34 IST)

केंद्र सरकार ६० वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘प्रधानमंत्री व्यय वंदना योजना’ नावाने एक पेन्शन योजना आणत आहे. एलआयसीमार्फत ही पेन्शन योजना ऑफलाइन किंवा ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने खरेदी करता येईल.

या योजनेअंतर्गत कमाल ६० हजार रूपये वार्षिक पेन्शन म्हणजेच दरमहा ५ हजार रूपये मिळतील. ६० हजार पेन्शनसाठी एकरकमी ७,२२,८९० रूपये जमा करावे लागतील. या योजनेअंतर्गत किमान पेन्शन वार्षिक १२ हजार म्हणजे दरमहा १ हजार रूपये मिळतील. यासाठी एकरकमी १,४४,५७८ रूपये जमा करून पॉलिसी खरेदी करावी लागेल. ही योजना १० वर्षांसाठी असेल. म्हणजे एकदा पेन्शन योजना खरेदी केल्यानंतर पुढील १० वर्षांपर्यंत पेन्शन घेता येऊ शकते. ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तीला या योजनेत भाग घेता येऊ शकतो.

वेबदुनिया वर वाचा