केंद्र सरकारची शेतकऱ्यांना दिवाळी भेट, मोहरी आणि गव्हाच्या MSP मध्ये वाढ
बुधवार, 16 ऑक्टोबर 2024 (16:24 IST)
केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी बुधवारी शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवली आहे.
एक अधिसूचना जारी करून सरकारने सांगितले की, गव्हासाठी एमएसपी 2275 रुपयांवरून 2425 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. त्याचबरोबर बार्लीचा एमएसपी 1850 रुपयांवरून 1980 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे.
हरभऱ्यावरील एमएसपी 5440 रुपयांवरून 5650 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. डाळींवरील (मसूर) एमएसपी 6425 रुपयांवरून 6700 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. मोहरीवरील एमएसपी 5650 रुपयांवरून 5950 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे.
बाजारात या पिकांचे दर सरकारच्या एसएमपी पेक्षा कमी किंवा जास्त होऊ शकतात.हे थेट पिकांच्या सरकारी खरेदीशी संबंधित आहे.
मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या या निर्णयाची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. त्यांनी पत्रकार परिषदेत एमएसपी मध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे.