CBSE : सीबीएसई 12वी वर्गात इंग्रजी कोरचा प्रश्नपत्र पॅटर्न बदलला

सोमवार, 25 फेब्रुवारी 2019 (12:38 IST)
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) ने 12वी च्या इंग्रजी कोरच्या प्रश्न पत्रात बदल केला आहे. त्यात आता 40 ऐवजी 35 प्रश्नच विचारले जातील. 5 प्रश्न कमी केले गेले आहे. मंडळानुसार हा बदल पाठ्यक्रम तज्ञांच्या फीडबॅक नंतर केला आहे. ही माहिती मंडळाने वेबसाइटद्वारे दिली आहे. बोर्डाने पठण आणि लेखन विभाग दोन्हीमध्ये बदल केले आहे. इंग्रजी कोर विषयाची परीक्षा 2 मार्च रोजी होणार आहे. यापूर्वी, सर्व परीक्षार्थींना ही माहिती मिळावी, त्यासाठी बोर्डाने शाळा आणि शिक्षकांना बरेच निर्देश दिले आहे. 
 
* पॅसेजची शब्द संख्या कमी केली गेली आहे - मंडळानुसार 2018 च्या प्रश्न पत्राच्या पॅटर्नमध्ये या वेळेस अनेक अंतर आहे. आतापर्यंत पॅसेज लिहिण्यासाठी परीक्षार्थीला बर्‍याच शब्दांमध्ये उत्तर द्यावे आवश्यक होते. एक पॅसेज 1100 ते 1200 शब्दांमध्ये आणि दुसरा पॅसेज 400 ते 500 शब्दांमध्ये करावे लागत होते. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पॅसेजची शब्दसंख्या कमी केली गेली आहे. आता 1200 ऐवजी 800 शब्दांमध्ये ते पूर्ण करावे लागतील. सेक्शन ए म्हणजे रीडिंग पार्टमध्ये आता 30 अंकांसाठी 19 प्रश्न असतील. आतापर्यंत 30 अंकांसाठी 24 प्रश्न असायचे. 
 
* मुख्य बदल :-
 
- मल्टीपल च्वाइस प्रश्नांची संख्या आता पाच होईल.
- लॉंग क्वेशचन एक ऐवजी दोन राहतील. दीर्घ उत्तरीय पाच-पाच अंकांचे राहतील. 
- अती लघु उत्तरीय प्रश्नांची संख्या 16 ऐवजी 9 करण्यात आली आहे.
- शार्ट क्वेशचन आता एक नसून दोन-दोन अंकांचे असतील. शार्ट क्वेशचनमध्ये आता एक नव्हे तर तीन प्रश्न असतील.
- वोकेबलरी असलेल्या प्रश्नांची संख्या आता एक ऐवजी तीन असेल. हे वेरी शॉट क्वेश्चनमध्ये राहतील. 
- आता 40 च्या ऐवजी 35 प्रश्नांची उत्तरे दिली जातील.
- पाठ्यक्रम तज्ज्ञांच्या बैठकीत प्राप्त झालेल्या फीडबॅकवर सीबीएसईने घेतलेला हा निर्णय. 
- रीडिंग आणि राइटिंग दोन्ही सेक्शनमध्ये बदल केले गेले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती