Rajasthan: राजस्थानमधील दौसा कलेक्टर सर्कलजवळ बस नियंत्रणाबाहेर गेल्याने भीषण अपघात झाला, ज्यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला. बसचे नियंत्रण सुटल्याने ती रेल्वे रुळावर पडली, त्यात चार जण ठार तर अनेक जखमी झाले. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात बसमधील सुमारे 24 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर डीएमसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रीय महामार्ग-21 वर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. येथे एक प्रवासी बस कल्व्हर्टचे रेलिंग तोडून खाली रेल्वे रुळावर पडली. आता या अपघातानंतर तिथून जाणाऱ्या गाड्यांची वाहतूकही ठप्प झाली आहे.
दौसा डीएम कमर चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 2.15 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग-21 वर एक भीषण रस्ता अपघात झाला. येथे बस हरिद्वारहून जयपूरच्या दिशेने जात होती. अपघाताची माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाला मिळताच जयपूर-दिल्ली रेल्वे मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांची वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली.