मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात ठार झालेले सर्व प्रवासी हे मध्य प्रदेशातील इंदूरचे रहिवासी असून ते उत्तराखंडच्या प्रवासाला निघाले होते. उत्तरकाशीमध्ये पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. येथे सतत पाऊस पडत आहे. अनेकजण वाहने उभी करून महामार्ग उघडण्याची वाट पाहत आहेत. कालच मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी यात्रेकरूंना हवामानाची माहिती मिळाल्यानंतरच यात्रा सुरू करण्याचे आवाहन केले.
राज्यात मुसळधार ते अतिवृष्टीसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. डेहराडून, टिहरी, चमोली, पौरी, डेहराडून, बागेश्वर, नैनिताल, अल्मोडा, रुद्रप्रयाग येथील शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मलारी येथे हिमनदी फुटल्याने एक पूल वाहून गेला असून, चमोली जिल्ह्यातील भारत-चीन सीमेला जोडणारी 10 गावे तुटली आहेत. तर कोटद्वार, बागेश्वर येथे मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हावर गेली आहे.