दिल्लीती 6 शाळांना पुन्हा बॉम्बची धमकी, तपास सुरू

शुक्रवार, 13 डिसेंबर 2024 (09:49 IST)
New Delhi News: राजधानी दिल्लीतील सहा शाळांना शुक्रवारी सकाळी बॉम्बची धमकी देणारा मेल मिळाला, त्यानंतर विविध यंत्रणांनी शाळेच्या परिसराची झडती सुरू केली आहे. तसेच यापूर्वी 9 डिसेंबर रोजी दिल्लीतील किमान 44 शाळांना अशाच प्रकारचे ईमेल प्राप्त झाले होते. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्या धमक्या अफवा असल्याचे म्हटले आहे.
ALSO READ: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेत्यांसोबत घेतली महत्त्वपूर्ण बैठक, आगामी बीएमसी निवडणुकीचा सांगितला फॉर्म्युला
मिळालेल्या माहितीनुसार या संदर्भात दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकारीने आज सांगितले की, आम्हाला ६ वाजता (धमकीच्या ई-मेल संदर्भात) कॉल आला. ते म्हणाले की, अग्निशमन विभाग, पोलिस आणि बॉम्ब निकामी पथकांसह श्वानपथक शाळांमध्ये पोहोचले असून तपास करत आहे. शाळा प्रशासनाने पालकांना संदेश पाठवून मुलांना शाळेत न पाठवण्याची विनंती केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती