भाजपचे नवे संसदीय मंडळ जाहीर : शिवराज आणि गडकरी बाहेर, येडियुरप्पा आणि या नेत्यांची निवड

बुधवार, 17 ऑगस्ट 2022 (14:35 IST)
भारतीय जनता पक्षाने नवीन संसदीय मंडळाची घोषणा केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्येष्ठ नेते शिवराजसिंह चौहान आणि नितीन गडकरी यांना मंडळात स्थान मिळालेले नाही. त्याचबरोबर बीएस येडियुरप्पा आणि बीएल संतोष यांना संसदीय मंडळात प्रवेश मिळाला आहे. 
 
संसदीय मंडळात यांना स्थान मिळाले-
जेपी नड्डा (अध्यक्ष), नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, बीएस येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जातिया, बीएल संतोष (सचिव)
 
याशिवाय केंद्रीय निवडणूक समितीही स्थापन करण्यात आली आहे. त्यात 15 सदस्यांचा समावेश आहे. केंद्रीय संसदीय समितीप्रमाणेच जेपी नड्डा यांना निवडणूक समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. 
 
निवडणूक समितीत यांना स्थान मिळाले-
जेपी नड्डा, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा, बीएस येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जातिया, भूपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, ओम माथूर, बीएल संतोष, वनथी श्रीनिवास  यांना स्थान मिळाले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती