पगारात घर चालत नाही, पेश्यांसाठी चोरी तर करावीच लागते: भाजप खासदार
उत्तर प्रदेशात भाजपाच्या एका खासदाराने विवादित विधान दिले आहे. भाजप खासदार हरीश द्विवेदी यांचे पगारावरून विवादित वक्तव्य समोर आले आहे.
बस्तीच्या जिल्हा पंचायत सभागरात एक युवा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात बस्ती लोकसभा सीटहून खासदार हरीश द्विवेदी यांनी केलेले वक्तव्य वादात सापडणार असे कळून येत आहे.
न्यूज एजेंसी एएनआयप्रमाणे, खासदार हरीश यांनी म्हटले की एका खासदाराला आपल्या क्षेत्रात कौशल्यतेने काम करण्यासाठी किमान 12 लोकांची गरज असते. अशात खासदाराने चोरी न करता प्रामाणिकपणे काम करावे असे वाटत असल्यास सुविधा वाढवण्याची गरज आहे.
त्यांनी म्हटले की पगाराने कोणतेही खासदार किंवा मंत्री आपलं क्षेत्र चालवू शकत नाही. त्यासाठी इकडून तिकडून सोय करावी लागते.