प्रसुती रजेत मिळणारा 7 आठवड्यांचा पगार

शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018 (15:32 IST)
महिला कर्मचाऱ्यांना लक्षात घेता सरकार आता महिलांना मिळणाऱ्या प्रसुती रजेबाबत मोठी घोषणा केली आहे.  प्रसुती रजेत मिळणारा 7 आठवड्यांचा पगार सरकार कंपनीला देणार आहे. केंद्रीय महिला आणि बाल विकार मंत्रालयाने गुरूवारी ही घोषणा केली. त्यांनी म्हटलं की, 15 हजाराहून अधिक मासिक वेतन मिळणाऱ्या महिलांना 7 आठवड्यांचा प्रसुती रजेबाबतचा पगार सरकार कंपन्यांना परत करणार आहे. महिला आणि बाल विकास विभाग सचिव राकेश श्रीवास्तव यांनी सांगितलं की, श्रण कल्याण अंतर्गत असलेल्या धनाचा वापर याकरता करणार आहे.
 
सरकारने ही घोषणा तेव्हा केली होती जेव्हा प्रसुती रजा हा 12 आठवड्यांवरून ती 26 आठवडे केली होती. ही प्रसुती रजा वाढवल्यावर कंपन्या गर्भवती महिलांना नोकरी देण्यास तयार नव्हते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती