पूर्ण जगात इंटरनेट ही सेवा आजच्या काळतील अपरिहार्य सेवा आहे. तिच्या शिवाय तर काम होणे शक्य नाही. इंटरनेट ही आता चैन नसून जीवनावश्यक गरज झाली आहे असे चित्र आहे. मात्र जीवनाश्यक गरजेबद्दल पाकिस्तानमधील 69 टक्के लोकांना कल्पनाच नाही असे समोर आले आहे. पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्रात एका सर्वेक्षणाच्या अहवालात ही माहिती दिली आहे. त्यामुळे मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे. श्रीलंकेच्या लाईनर एसिया या या संस्थेने हे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. यामध्ये सर्वेक्षणाच्या अहवालानुसार 15 ते 65 वयोगटातील 69 टक्के लोकांना इंटरनेट हा काय प्रकार आहे याची थोडी सुद्धा संकल्पनाच माहित नाही. ऑक्टोबर 2017 च्या ते डिसेंबर या दरम्यान हे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. विविध भागातील प्रदेशातील सर्वेक्षणात २ हजार कुटुबांना प्रश्न विचारले गेले. इंटरनेटबद्द्ल माहिती असलेल्यांची संख्या ही केवळ 31 टक्के आहे असे समोर आले आहे. इंटरनेटबाबत जागृकता नसल्याने इंटरनेटचा वापर कमी असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्थान भारता सोबत कोणत्या ताकदीवर लढायचे म्हणतो आहे हे कळणे अवघडच आहे.